मुंबई
शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर…

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात दोन नावांचा समावेश आहे. बजरंग सोनावणे आणि सुरेश म्हात्रे.
बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकूण ७ उमेदवार जाहीर केले आहेत.