डोंबिवलीत ३७२ कसुरदार वाहन चालकांवर कारवाई…

डोंबिवली – पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात ३७२ कसुरदार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली. हि कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूम मधून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दिनांक ६ जुलै पासून डोंबिवली पश्चिम मच्छी मार्केट जवळील रेल्वे स्टेशन गेट समोर स्मार्ट सिटी अंतर्गत लवण्यात आलेल्या CCTV camera व्दारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक ६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२३ या दरम्यान डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात ३७२ कसुरदार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोर पालन करावे. स्टेशन परिसर वाहतूक कोंडी मुक्त ठेवण्यासाठी वाहतूक विभागाला सहकार्य करावे. असे आवाहन डोंबिवली वाहतूक विभागाकडून सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.