मुंबई
मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग…

मुंबई – मालाडमध्ये झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत जवळपास ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. मालाड पूर्वेतील कुरार येथील जामऋषी नगर भागातील झोपडपट्टीला भीषण आग लागली.

आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे.