वाचन आदान प्रदान कॉफी टेबल बुक चे प्रकाशन संपन्न…

डोंबिवली – पै फ्रेंड्स लायब्ररी च्या वतीने २० ते २९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक आदान प्रदान उपक्रमाचे निमित्याने ‘ वाचन आदान प्रदान‘ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन ख्यातनाम लेखक अच्युत गोडबोले प्रख्यात राजकीय विश्लेषक डॉ उदय निरगुडकर, ज्येष्ठ अनुवादिका उमा कुलकर्णी यांचे हस्ते पार पडले.
याप्रसंगी ‘मी डोंबिवलीकर‘चे संपादक व मंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार राजू पाटील उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे वाचन विषयक अनुभव, मुलाखती, सध्या करीत असलेले वाचन असे वाचन विषयक संचित या पुस्तकात प्रकाशित करण्यात आले आहे.
या संग्राह्य कॉफी टेबल बुकचे प्रकाशक पुंडलिक पै आहेत. डॉ योगेश जोशी यांनी संपादित केलेल्या या कॉफी टेबल बुक मध्ये अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, कुमार केतकर, दिनकर गांगल, अच्युत गोडबोले, प्रल्हाद दादा पै, श्रीधर फडके, पं सुरेश तळवलकर, डॉ अरुणा ढेरे, रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, केडीएमसी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, संजय मोने, समीर चौघुले, मुक्ता बर्वे, डॉ अमोल कोल्हे, महेश म्हात्रे, प्रवीण दवणे, अद्वैत दादरकर, सुहास जोशी, सुधीर गाडगीळ, गुरु ठाकूर, सुधाताई म्हैसकर, चंद्रशेखर टिळक, मेधा किरीट, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, ज्येष्ठ समाजसेवक माधव जोशी ज्येष्ठ प्रवचनकार अलका मुतालिक, एसीपी सुनील कुराडे, खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण, विवेक पंडीत, अनिकेत घमंडी, प्रभाकर भिडे, शाम जोशी, डॉ गंगाधर वारके, ॲड डॉ सोपान बुडबाडकर, जनार्दन ओक, प्रा जितेंद्र भामरे, निता तोरसकर आदी अनेक मान्यवरांचे लेखन वाचायला मिळणार आहे.
सदर पुस्तकामध्ये उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, केडीएमसी आयुक्त डॉ भाऊ साहेब दांगडे यांचे शुभ संदेश प्रकाशित करण्यात आले आहेत. तसेच अनुया गरवारे धारप, सुकन्या जोशी, हेमंत नेहेते, अमेय घैसास, ममता शिंदे यांनी लेखांचे शब्दांकन केले आहे.