दिड लाखांची लाच घेताना वरिष्ठ लिपिकाला रंगेहात अटक…

पुणे – दिड लाखांची लाच घेताना वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहात अटक केली. सचिन अशोक देठे असे या लिपिकाचे नाव आहे. ते शिवाजीनगर पुणे येथील सत्र न्यायालयात वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होते.
तक्रारदारांचे मावस भावाच्या विरूद्ध दाखल असलेल्या खून व मोका केसचा खटला सत्र न्यायालय, शिवाजीगनर पुणे येथे सुरू असून खटल्याच्या साक्षीचे जाबजबाब टायपिंग करताना आवश्यक ते बदल करून त्या केसमधून सुटकेसाठी मदत करतो असे सांगून वरिष्ठ लिपिक सचिन देठे यांनी १०,००,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली.
त्यानंतर सदर तक्रारीची पडताळणी केली असता सचिन देठे यांनी २,००,०००/- लाख रूपयांची लाचेची मागणी केली व त्यापैकी १,५०,०००/- रूपये घेतल्यानंतर एसीबीने त्यांना रंगेहात अटक केली.