डोंबिवलीत घर मालकाने भाडेकरूचे सामान बाहेर फेकले…

डोंबिवली – एका घर मालकाने एका वयोवृद्ध भाडेकरूचे सामान बाहेर फेकले व सामानाची तोडफोड केली तसेच हाताचे बोट मोडून धमकी देखील दिली असल्याची घटना घडली.
सयदा हुसेन सय्यद असे भाडेकरूचे नाव आहे. क्रिष्नन नारायणकुमार सिन्हा असे घर मालकाचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सय्यद यांच्या तक्रारीवरुन सिन्हा यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोशिओ, लेकशोअर पलावा, डोंबिवली (पू) येथे राहणाऱ्या सयदा या घरी एकट्याच असताना घर मालक क्रिष्नन सिन्हा हे जबरदस्तीने घरात घुसले आणि त्यांनी सयदा यांचे घरातील सामान बाहेर फेकले व सामान तोडले तसेच सयदा यांचा उजव्या हाताचे बोट पकडून मुरगळले त्यामुळे त्यांना दुखापत झाली. तसेच क्रिष्नन सिन्हा याने तुला बघुन घेईन अशी दमदाटी देखील केली.