kalyan
केडीएमसीच्या लिपिकाला लाच घेताना अटक…

kalyan – कल्याण डोंबिवली महापालिकेतील एका लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यालयातील बाजार परवाना विभागात हा लिपिक कार्यरत आहे. प्रशांत धिवर असे याचे नाव असून, किती रुपयांची लाचेची मागणी केली होती हि माहिती अजून कळू शकलेली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण माहिती समोर येणार आहे.