सोनसाखळी चोरणाऱ्या दोन इराणींना गुन्हे शाखेने केली अटक…

ठाणे – सोनसाखळी चोरणाऱ्या दोन इराणींना गुन्हे शाखा घटक ५ वागळे इस्टेट पोलिसांनी अटक करून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आसिफ शब्बीर सैय्यद आणि बागर आसिफ सैय्यद अशी या दोघांची नावे आहेत.
श्रीनगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु असताना, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इंदिरानगर नाका परिसरातून या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सोनसाखळीसह मोटार सायकल चोरीचे दाखल असलेले १४ गुन्हे उघकीस आणले. तसेच १४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २ मोटार सायकल असा एकूण ५,४०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, पोलीस आयुक्त शोध १ (गुन्हे) निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांच्या पथकाने केली.