रिक्षा चोरणारा सराईत गजाआड…

kalyan – रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलीसांनी अटक करून त्याच्याकडून ४ रिक्षा हस्तगत केल्या आहेत. राजेंद्र जाधव असे याचे नाव आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोळसेवाडी आणि इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रिक्षा चोरीच्या घटना घडत होत्या, त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण पूर्वेतील १०० फुटी रस्त्यावरून राजेंद्रला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने कोळसेवाडी हद्दीत ३, बाजारपेठ हद्दीत १ रिक्षा चोरली असल्याचे सांगितले.

निर्जनस्थळी आणि पार्किंगमध्ये असलेल्या रिक्षांचे लॉक तोडून त्या रिक्षा तो चोरी करत असे. सदर प्रकरणी पोलिसांनी चार रिक्षा जप्त करून त्याला अटक केली आहे. दरम्यान, यापूर्वीही त्याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस निरीक्षक साबाजी नाईक, साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील, संदीप भालेराव, हवालदार सचिन कदम, विशाल वाघ, भगवान सांगळे, गोरक्षनाथ घुगे, विकास भामरे, सुरेंद्र इंगळे यांच्या पथकाने केली आहे.