पार्क केलेल्या रिक्षाची चोरी करणारे गजाआड…

डोंबिवली – पार्क केलेल्या रिक्षाची चोरी करणाऱ्या दोघांना डोंबिवली पोलिसांनी अटक केली. 1) तेजस गोपाळ नायर 2) मयूर गणेश केणे अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १ रिक्षा जप्त केली.
याबाबत वृत्त असे आहे कि, डोंबिवली पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना मानव कल्याण हॉस्पिटल च्या मागे टाटा लेन, डोंबिवली पूर्व या ठिकाणी २ इसम संशयितरित्या १ रिक्षासह जात असताना दिसून आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदेर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप आणि पोहवा वाघ, निवळे, सरनाईक, पो अ रावखंडे, सांगळे सदर पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेल्या रिक्षा बाबत कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पोलिसांनी सदर वाहनाची अभिलेख पडताळणी केली असता डोंबिवली पोलीस ठाणे गु. र.क्र 325/2022 कलम 379भादंवि मधील असल्याचे दिसून आले.
सदर प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून सदर रिक्षा जप्त केली.