मुंबई
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं!…

नवी दिल्ली- शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.
नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडेपर्यंत दोन्ही गटांना हे निर्बंध लागू असणार आहेत.