मुंबई
कुर्ल्यात रहिवासी इमारतीला भीषण आग…

मुंबई – कुर्ल्यातील एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील नवीन टिळक नगर रेल व्ह्यू इमारतीत ही मोठी इमारत आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली आहे. या इमारतीमध्ये काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान, घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, अग्नीशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.