महाराष्ट्र
शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी…

धाराशिव – शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी किताबाचा दुसऱ्यांदा मानकरी ठरला आहे. धाराशिव येथे ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत पार पडली. या लढतीत पैलवान शिवराज राक्षे हा विजयी झाला असून त्याने दोन वेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात अंतिम सामना रंगला होता. यात शिवराज राक्षे याने ६-० ने हर्षवर्धन सदगिरचा पराभव करत पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.