ठाणे

खुनाच्या प्रयत्नातील आरोपी गजाआड…

thane – सन २०२४ मधील खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपीस पकडण्यात ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, पोलिसांना यश आले आहे. तरूण वाल्मीकी असे या आरोपीचे नाव असून, अटक टाळण्यासाठी तो वेगवेगळया ठिकाणी अस्तित्व लपून राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर आरोपीवर चितळसर पोलीस ठाणे गु.र.क्र. ९२८/२०२४ भा.न्या स. कलम १०९, ११५(२)११८(२), १२६ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अटक टाळण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी अस्तित्व लपून राहत होता.

मध्यवती गुन्हे शोध कक्षाकडून सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाण्यातील कोर्ट नाक्याजवळून तरूण वाल्मीकीला अटक केली. आणि त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीकारीता चितळसर पोलीस ठाण्यात हजर केले.

सदरची यशस्वी कामगिरी वपोनि, प्रफुल्ल जाधव, (मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे ) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/नितीन खाडे, पोउपनि/सुरेश माळोदे, पोशि/योगेश क्षीरसागर, पोशि/अशोक ढवळे, पोशि/रविदास जाधव, पोशि/संजय करंकाळ, पोशि/दत्ता घोडके यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page