महापौरांच्या समोरच BMC अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला…

mumbai – मुंबईच्या महापौर रितू तावडे पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करत असताना त्यांच्या समोर महापालिकेचा एक अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची घटना माटुंगा परिसरात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माटुंगा परिसरात पाहणी दौऱ्यादरम्यान कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर रितू तावडे या एका अधिकाऱ्यासोबत बोलत होत्या त्यावेळी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे आणि उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने एक अधिकारी मॅनहोलमध्ये पडला. महापौरांच्या डोळ्यांदेखत हि घटना घडली.
दरम्यान, तिथे उपस्थित असलेले नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत त्या अधिकाऱ्याला सुखरूप बाहेर काढले.
या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि शहरातील उघड्या मॅनहोलच्या गंभीर समस्येवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



