mumbra : ‘लाल किल्ला’ धाब्याजवळ गोळीबार…

thane – मुंब्रा येथील ‘लाल किल्ला’ धाब्याजवळ गोळीबार झाला असल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एकाच मृत्यू झाला असून, ३ जण जखमी झाले आहेत. सदर प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
जयन शिवानंदन नायर असे आरोपीचे नाव असून, अकबर अब्दुल शेख मयत इसमाचे नाव आहे तर अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख, समीर अहमद शेख अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘लाल किल्ला’ धाब्याजवळ सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालय कैलास नगर मुंब्रा येथे बिस्मिल्ला चाळ रूम नंबर दोन येथे हि घटना घडली. आरोपी जयन नायर याची मानलेली बहीण अन्नू शेख हिला सदर जखमी व्यक्ती छेडछाड करतात या कारणावरून वाद होऊन नायर याने हा गोळीबार केला. आणि तेथून पळ काढला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच तपास करुन, आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले.



