हिवाळी अधिवेशनात 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर…

nagpur – विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज पासून नागपुरात सुरू झाले असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्या सादर केल्या.
अधिवेशनात एकूण रु. ७५,२८६.३८ कोटींच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर करण्यात आल्या आहेत. यापैकी रु. २७,१६७.४९ कोटींच्या अनिवार्य, रु.३८,०५९.२६ कोटींच्या कार्यक्रमांतर्गत व रु. १०,०५९.६३ कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
पुरवणी मागण्यांपैकी १५ हजार ६४८ कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी ६ हजार कोटींहून अधिक तर मनरेगासाठी साडे ३ हजार कोटी रुपयांची तरतूद यात आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी ३ हजार कोटी रुपये तर एसटी महामंडळासाठी २ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. आयुष्मान भारतासाठी सव्वा ३ हजार कोटी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद सरकारनं यात केली आहे.
विभागनिहाय पुरवणी मागण्या…
महसूल व वन विभाग- 15,721.08 कोटी रुपये
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग- 9205.90 कोटी रुपये
नगर विकास विभाग- 9195.76 कोटी रुपये
सार्वजनिक बांधकाम विभाग- 6347.41 कोटी रुपये
महिला व बाल विकास विभाग- 5024.48 कोटी रुपये
नियोजन विभाग- 4853.99 कोटी रूपये
गृह विभाग- 3861.12 कोटी रुपये
सार्वजनिक आरोग्य विभाग- 3602.80 कोटी रुपये
जलसंपदा विभाग- 3223.39 कोटी रूपये
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग- 2395.44 कोटी रुपये

