ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन!…

mumbai – बॉलिवूडचे हि मॅन अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र हे गेली अनेक दिवस आजारी होते. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

धर्मेंद्र यांनी चित्रपट जगतात आपला ठसा उमटवला. 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट जगतात प्रवेश केला. त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये धरमवीर, यादों की बारात, शोले, ड्रीम गर्ल, मेरा गाव मेरा देश, नौकर बीवी का आणि लोफर यांचा समावेश आहे. अभिनयासोबतच धर्मेंद्र यांनी विजयता फिल्म्सची स्थापना केली आणि बेताब आणि बरसात यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली. धर्मेंद्र यांचा आगामी सिनेमा इक्कीस २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे.



