मुंबई
११.८० कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक…

mumbai – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाने विशेष मोहिमे अंतर्गत मे.ढोलकिया एन्टरप्राइजेस, जीएसटी क्रमांक २७AMBPD१५६३G१ZG या कंपनीचे प्रोप्रायटर इब्राहिम असलम ढोलकिया यांना अटक केली आहे.

मे. ढोलकिया एन्टरप्राइजेस या व्यावसायिकाविरोधात विभागातर्फे कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान सदर व्यापाऱ्याने चुकीची कर वजावट व बनावट बिजके (इनव्हॉइस) जारी करून ११.८० कोटींची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.
इब्राहिम असलम ढोलकिया यांस ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वित्तीय वर्ष २०२५-२६ मधील ही २९ वी अटक आहे.