मुंबई

५०० रुपयांच्या बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड…

mumbai – भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा बनवणाऱ्या आणि त्या नोटा चलनामध्ये वितरीत करणाऱ्या चार जणांच्या टोळीला भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. उमरान उर्फ आसिफ उमर बलबले, यासिन शेख, भीम बहेला आणि निरज वेखंडे अशी यांची नावे असून, त्यांच्याकडून ५०० रूपये दराच्या एकूण २०० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

भायखळा पूर्व येथे तीनजण भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून तिघांना अटक केली आणि त्यांच्याकडून भारतीय चलनाच्या ५०० रूपये दराच्या एकूण २०० बनावट नोटा जप्त केल्या.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत खलील अन्सारी व निरज वेखंडे हे दोघे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात या बनावट नोटा बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता निरज वेखंडे मिळून आला. त्यालाही अटक करण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी ५०० रूपये दराच्या एकूण २०० बनावट नोटा आणि या नोटा बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जप्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page