मुंबई
अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड…

mumbai – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध आणि एकमताने निवड झाली आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली. या पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी एकमताने त्याला मंजुरी दिली. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सकारात्मक भूमिका घेत बनसोडे यांच्या निवडीला पाठिंबा दर्शवला.