ठाणे
लाच प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई…

ठाणे – लाच प्रकरणी एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.रवींद्र भाऊराव चव्हाण असे सपोउपनिचे नाव असून, ते ठाणेनगर शहर वाहतूक शाखा, ठाणे येथे कार्यरत आहेत. ३०००/- रु. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने त्यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तक्रारदार यांची ऑटो रिक्षा, नौपाडा वाहतूक विभाग येथील चौकीला थांबवून ठेवली होती, सदर ऑटो रिक्षा सोडण्यासाठी रवींद्र भाऊराव चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे ३,०००/- रू. ची लाचेची मागणी केली म्हणून एसीबीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.