मुंबई

मुंबईत अनधिकृत कॉल सेंटरवर कारवाई…

मुंबई – चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या अनधिकृत कॉलसेंटरवर कक्ष ११, गुन्हे प्रकटीकरण शाखा, कांदिवली (प) पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी सदर प्रकरणी ६ जणांना अटक केली आहे. इंदरकुमार रविशंकर पाशी, इरफान इक्बाल दानावाला, जाहीद झेवीयर शेख, श्रीजू वलसन पणीकर, इसई कुमार, अंकुश संजर शर्मा अशी या अटक कऱण्यात आलेल्या ६ जणांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, वन ७२१ ग्लोबल सर्विसेस प्रा. लि., ३०१, तिसरा माळा, DLH पार्क, सुंदर नगर, एम.टी.एन.एल. टेलिफोन एक्सचेंज, एस.व्ही. रोड, गोरेगाव पश्चिम, या ठिकाणी www.wbandsmith.com या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलेल्या आखाती देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांना इंटरनेटद्वारे व्हाईप कॉल करुन ते www.wbandsmith.Com या कंपनीच्या वेबसाईट वरून फॉरेक्स शेअर्स करन्सी व कमोडीटी ट्रेडिंग करण्याबाबत facebook, instagram investigation.com इत्यादी वर जाहिरात देवून ते मॉरिशस येथून बोलत असल्याचे दाखवून आखाती देशातील भारतीय नागरिकांशी इंग्रजी, हिंदी व इतर भाषेमध्ये संभाषण करून त्यांचा विश्वास संपादन करतात व त्यांना ते फॉरेक्स ट्रेंड, करन्सी, कमोडीटी यांचे एक्सपर्ट असल्याचे सांगुन प्रत्येक कस्टमरला कमीत कमी २०० डॉलर्स इतकी रक्कम क्रेडीट करायला सांगतात. त्यानंतर २४ ते ४८ तासाच्या कालावधीनंतर ट्रेडींग सुरु होईल असे आश्वासन देऊन रक्कम क्रेडिट झाली की मग परत न देता फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी काही इसम कोणतेही परवाने न घेता भारतामध्ये अनधिकृत कॉल सेंटर चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्यांचेकडे सदर कॉलसेंटरबाबत अधिक चौकशी केली असता अशा प्रकारे त्यांनी २५०० ग्राहकांची भारतीय चलनी रुपयात अंदाजे रु ४ कोटीच्यावर फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान पोलिसांनी सदर सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून एकूण ३ सर्व्हर, ६ लॅपटॉप, १ हेडफोन हस्तगत केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page