लाचप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल…

mumbai – कमर्शियल केसमध्ये नाव न टाकण्यासाठी १ लाख रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७० हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केल्याप्रकरणी मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश येडगे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या भावाला डोंगरी पोलीस ठाणे येथे NDPS कारवाई करीता पकडण्यात आले होते. त्यांचे नाव कमर्शीअल केस मध्ये न टाकण्यासाठी ज्ञानेश येडगे यांनी फिर्यादींकडे १ लाख रुपयांची लाचेची मागणी केली असल्याबाबत फिर्यादीने मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी केली असता, ज्ञानेश येडगे यांनी तडजोडीअंती ७० हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले असल्याबाबत निष्पन्न झाल्याने सदर परकरणी एसीबीने पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



