मुंबई
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन…
mumbai – देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नियमित तपासणीसाठी रतन टाटा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते. तसेच उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.