डोंबिवली : दोन गटात जोरदार राडा…
dombivali – तरुणीची छेड काढण्यावरुन दोन गटात जोरदार राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरात हि घटना घडली असून, याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीची दोन तरुणांनी छेड काढली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जाकिर शेख आणि अरहम सय्यद या दोघांवर हा आरोप करण्यात आला आहे. या दोघांनी तरुणीला तिचा मोबाइल नंबर देखील मागितला. तरुणीने हा संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तरुणीचे नातेवाईक जाब विचारण्यासाठी अरहम सय्यद याच्या घरी गेले असता, तरुणीचे नातेवाईक आणि तरुणाच्या नातेवाईकांमध्ये जोरदार वाद झाला.
दरम्यान, याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल करत जाकिर शेख आणि अरहम सय्यद या दोघांना तसेच दुसऱ्या गटातील तिघांना अटक केली आहे.