महाराष्ट्र
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात १३ जणांना अटक…
PUNE – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी १३ जणांना पुणे पोलिसांनी ताम्हिणी घाटातून अटक केली आहे. हे सर्वजण खुनाच्या घटनेनंतर फरार झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण जेवण्यासाठी ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते, जेवण झाल्यानंतर तेथून ते पुढे जाणार होते. त्याआधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, याआधी वनराजच्या दोन सख्ख्या बहिणी आणि मेहुण्यांनाही अटक करण्यात आली आहे.