शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंवर कारवाई…
mumbai – विधान परिषदेमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दानवे यांचे विधानपरिषदेचे सदस्यत्व पद पाच दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे.
सोमवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता. त्यावेळी अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केली होती. याकारणावरून अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे.
याबाबत नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर आवाजी मतदानाने अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निलंबनाच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.