ऑनलाईन गंडा घालणारा गजाआड…

नवी मुंबई – इनकम टॅक्स विभागाची व इतर कारणाबाबत धमकी देऊन केस मध्ये अटक करण्यात येईल असे सांगून ऑनलाईन गंडा घालणाऱ्या गुन्हेगारास चेन्नई येथून सायबर पोलीस ठाणे, नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. लोकेश कुमार असे याचे नाव आहे.
फिर्यादी यांना त्यांच्या नावाचे नागपूर येथे बँक खाते उघडले असल्याचे सांगून त्यामध्ये मोठया प्रमाणात पैशांची देवाण-घेवाण होत आहे तसेच फिर्यादी यांच्या नावाने कॅनडा देशात अवैध पार्सल पाठविले जात असल्याने नॅशनल सेक्युरीटीचा इश्यु असल्याचे सांगुन, इनकम टॅक्स विभागा मार्फत कारवाई करून केसमध्ये अटक करण्यात येईल असे सांगून सदर केस मध्ये अटक न करण्याकरीता तसेच जामीनाच्या नावाखाली वेगवेगळया बँक खात्यावर टप्याटप्याने एकूण २१,२२,८००/- रू. स्वीकारून फसवणूक केली असल्याबाबत सायबर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे लोकेश कुमारला चेन्नई येथून अटक केली.