मुंबई
ठाणे महापालिका आयुक्तांची बदली…

ठाणे – ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, अश्विनी भिडे यांचा समावेश आहे.
अभिजित बांगर यांना मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अश्विनी भिडे या मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर कार्यरत होत्या. आता त्यांची बदली मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या संचालकपदी करण्यात आली आहे.