नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक २०२४ जाहीर, महाराष्ट्रात कधी होणार मतदान, पहा सविस्तर…

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक २०२४ ची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज निवडणुकांची घोषणा केली.

देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. या सात टप्प्यांमध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल.

सात टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – 19 एप्रिल, दुसरा टप्पा – 26 एप्रिल, तिसरा टप्पा – 7 मे, चौथा टप्पा – 13 मे, पाचवा टप्पा – 20 मे, सहावा टप्पा – 25 मे, सातवा टप्पा – 1 जून

महाराष्ट्रात मतदान कधी?

पहिला टप्पा  – मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5)

दुसरा टप्पा – मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8)

तिसरा टप्पा – मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )

चौथा टप्पा – 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड  (एकूण मतदारसंघ – 11 )

पाचवा टप्पा – 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page