डोंबिवली

डोंबिवलीत Excuse Me म्हटल्यामुळे तरुणींना मारहाण…

dombivali – रस्त्यावर वाटेत उभ्या असलेल्या काही तरूणांना बाजूला होण्यासाठी Excuse Me म्हटल्यामुळे दोन तरुणींना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात घडली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, सदर प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात अनिल पवार, बाबासाहेब ढबाले, रितेश ढबाले या तीन तरुणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश श्रद्धा बिल्डींगमध्ये ही हाणामारी झाली. तरुणी दुचाकीने इमारतीत जात असताना रस्त्यात उभे असलेल्या तिघांना excuse me असं म्हणत बाजूला व्हायला सांगितले. मात्र यानंतर तरुणांनी इंग्रजीत बोलायचं नाही मराठीतच बोलायचं असं म्हणत वाद घातला आणि वाद विकोपाला जाऊन तरुणांनी थेट या दोन तरुणींना मारहाण केली.

रितेश बाबासाहेब ढबाले, त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढबाले आणि त्यांच्या काही साथीदारांनी  इंग्रजी नको, मराठीत बोला  म्हणत दोघींना चापटा मारून बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर या गोंधळात एका पीडीतेचा नवरा आणि दुसरी मैत्रीण तेथे मदतीला आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page