मुंबई
भाईंदरमध्ये झोपडपट्टीला भीषण आग…

मुंबई – भाईंदर पूर्वेच्या आझादनगर परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीत पहाटेच्या सुमारास हि आग लागली आगीत काही जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनस्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.