मुंबई
प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे निधन…

मुंबई – प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या कुटूंबियांकडून त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, आपल्या जादूई आवाजाने त्यांनी नेहमीच रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.