मुंबई
अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश!…

मुंबई – अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांनी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांंशी देखील संवाद साधला होता. आज मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मी कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही. आज मी नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. भाजपमध्ये रितसर प्रवेश करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटले.