मुंबई
अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम!…

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिले असून, या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा रादीनामा दिला आहे.

दरम्यान, मी काँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे काम केले आहे. माझी कोणाबद्दलही तक्रार नाही, पुढील दोन दिवसात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार अशी प्रतिक्रिया राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दिली आहे.