रिक्षात विसरलेले २२ तोळ्यांचे दागिने महिलेला परत मिळवून दिले…

dombivali – रिक्षातून प्रवास करत असताना एका महिलेने २२ तोळ्यांचे दागिने रिक्षात विसरले होते. ते दागिने डोंबिवली पोलिसांनी या महिलेला परत मिळवून दिले आहेत.
अश्विनी किर्पेकर असे या महिलेचे नाव असून, सदर महिला हि गणपती मंदिर, मानपाडा ते डोंबिवली रेल्वे स्टेशन असा रिक्षातून प्रवास करत असताना त्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षामध्ये विसरल्या त्यात २२ तोळ्यांचे दागिने आणि कपडे होते.

याप्रकरणी महिलेने डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता, तात्काळ डोंबिवली पोलीस ठाण्याचे वपोनि गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नवनाथ वाघमोडे, पोलीस अंमलदार मंगेश वीर यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून रिक्षाचा शोध घेऊन महिलेचे सोन्याचे दागिने (किंमत १६,३५,०००/- रुपये) वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या हस्ते परत मिळवून दिले.
त्यावेळी अश्विनी किर्पेकर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड आणि अधिकारी, अंमलदार यांचे खूप आभार मानले.