मुंबई
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश…

मुंबई – काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वर्षा निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यासोबतच मुंबईतील 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांनी देखील मिलिंद देवरा यांच्यासोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी खासदार राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.