महाराष्ट्र
साताऱ्यात महिलेला मारहाण…

सातारा – माण तालुक्यातील पानवन येथे भररस्त्यात एका महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून चौघांनी महिलेला उसाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच या महिलेवर धारदार शस्त्राने वार देखील करण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी या चौघांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर दोघे पळून गेले आहेत. दरम्यान, महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.