मुंबई
मांजाने गळा चिरून पोलिसाचा मृत्यू …

मुंबई – पतंगाचा मांजा गळ्याला लागल्याने गळा चिरून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सुरेश जाधव असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ड्युटी संपल्यानंतर ते मोटारसायकलवरून घरी जात असताना वाकोला उड्डाणपुलावर हा अपघात झाला. उपचारासाठी त्यांना सायन रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.