मुंबई
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर कारवाई…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. शरद पवार यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
मी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे पक्षविरोधी कारवाया केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे. असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे दोघांवर कारवाई करावी अशी मागणी करत शरद पवारांना एक पत्र लिहले होते. त्यानंतर पवारांनी हा निर्णय घेतला.