मुंबई
राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के…

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. त्यासोबतच यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 93.73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.14 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण – 96.01
पुणे – 93.34
कोल्हापूर – 93.28
अमरावती – 92.75
औरंगाबाद – 91.85
नाशिक – 91.66
लातूर – 90.37
नागपूर – 90.35
मुंबई – 88.13