एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात…

मुंबई – एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सध्या दया नायक हे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत आहेत. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दया नायक यांचाही समावेश असून ते मुंबई पोलीस दलात रुजू होणार आहेत. अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणानंतर त्यांची बदली एटीएसमधून गोंदिया येथे करण्यात आली होती.
दरम्यान, पोलीस दलात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यात दौलत साळवे, ज्ञानेश्वर वाघ यांचीही दहशतवादविरोधी पथकातून मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर, नागिन काळे, कैलास बोंद्रे, अशोक उगले, रमेश यादव, मुरलीधर करपे यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.