ठाणे
भिवंडीत इमारत कोसळली…

ठाणे – भिवंडीच्या वळपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, बचावकार्य सुरु आहे.

भिवंडतील्या कैलासनगर (वळपाडा) येथे वर्धमान कंपाउंडमध्ये दुपारच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर साधारण ३ ते ४ कुटुंब राहत होते. खालच्या मजल्यावर कामगार काम करत होते.