कमी किंमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगून फसवणूक करणारे अटक…

ठाणे – कमी किंमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
हसन मुसा शेख, वहावली अमीरअली खान, हैदर नयानशे ख, माजीदअली ताहीर हुसेन, फरजाना उर्फ काजली अमीरउल्ला शेख अशी यांची नावे आहेत.
देवनार पोलीस स्टेशन, मुंबई येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी ठाण्यातील साकेत रोडवरील महालक्ष्मी मंदिरासमोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून सदर पाच जणांच्या टोळीला अटक केली. आणि त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच मोबाईल असा एकूण १,८६,२००/- रू किमंतीचा माल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, शोध -2, गुन्हे शाखा, ठाणे शहर, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील वपोनि/मालोजी शिंदे, मपोनि/वनिता पाटील, सपोनि/भुषण कापडणीस, सपोनि/सुनिल तारमळे, पोउनि/विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाश तावडे, सपोउनि/संजय बाबर, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/गणेश गुरसाळी, पोहवा/भोसले, मपोहवा/शितल पावसकर, पोहवा/निलेश जाधव, मपोशी/मयुरी भोसले, पोशी/तानाजी पाटील, पोशी/अरविंद षेजवळ, पोशी/विनोद ढाकणे चापोना/भगवान हिवरे चोमपोशी/ज्योती शार्दुल यांनी केली आहे.