मुंबई
…याचे परिणाम भोगावे लागतील; संभाजीराजेंचा आव्हाडांना इशारा…

मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.
जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील, असे ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.