ठाणे
व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे गजाआड…

ठाणे – व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या दोघांना श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मुझमिल मझर सुभेदार आणि शहजाद शब्बिर कादरी अशी या दोघांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्याकडून उच्च दर्जाचे अत्तर तसेच सेंट तयार करण्याकरीता आवश्यक असणारी सुमारे ३ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त केली.

दोन व्यक्ती गोपाळ आश्रम समोरील रोड नं १६, वागळे ईस्टेट, ठाणे याठिकाणी व्हेल माशाची उलटी विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोघांना व्हेल माशाच्या उलटीसह अटक केली.