मुंबई
अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार…

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीतून भाजपने अखेर माघार घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात घोषणा केली.
उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेत असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.