मुंबई
ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा…

मुंबई – ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असे आदेश हायकोर्टाने मुंबई पालिकेला दिले आहेत.
या निर्णयामुळे ऋतुजा लटके यांना विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे.