आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला…

औरंगाबाद – शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. सध्या शिवसंवाद यात्रा सुरु आहे. यानिमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील महालगावात त्यांची सभा होती. त्यादरम्यान, त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगड फेकीची घटना घडली.
याबाबत वृत्त असे आहे कि, आदित्य ठाकरे महालगावात पोहोचल्यावर त्यांचा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. परंतु सभा सुरू होण्याच्या दरम्यान रमाईंची मिरवणूक सुरु झाली होती. सभास्थळी स्टेजच्या पाठीमागून मिरवणूक जात असताना डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने वाद झाला.
तसेच सभेमध्ये शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरु असताना अज्ञात व्यक्तीने स्टेजवर दगड भिरकावल्याचेहि समोर आले आहे. त्यानंतर सभा संपल्यावर पुन्हा एकदा आदित्य यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही जणांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना देखील घडली.